पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रुग्णालयात प्रेयसीशी लग्न करून प्रियकर फरार, पोलिसांकडून शोध सुरु

(छाया सौजन्य : ANI)

रुग्णालयात प्रेयसीशी लग्न करून  काही वेळातच फरार झालेल्या प्रियकराचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.  लग्नाचे आमिष दाखवून तरुणानं लग्नास नकार दिल्यानं मुळच्या बुलढाणा जिल्ह्यातील व सध्या चाकण येथील आंबेठाण चौक परिसरात वास्तव्यास असलेल्या सव्वीस वर्षीय तरुणीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. काही संघटनांच्या दबावामुळे संबंधित तरुणाला रुग्णालयात आणून चक्क रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दोघांचे लग्न लावून दिले. मात्र लग्न लागताच काही वेळानं  तरुणाने तिथून धूम ठोकली. 

अजित पवारांना दिलेल्या क्लीन चीटशी माझा संबंध नाही - फडणवीस

सबंधित पीडित तरुणी  मैत्रिणीबरोबर आंबेठाण चौकात राहत असताना तिची आरोपी सुरज भारतशी  ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यामुळे सुरज हा नेहमी तिच्या संपर्कात राहायचा. त्यानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले दरम्यानच्या काळात संबंधित तरुणीने सुरज याच्याकडे लग्नाचा तगादा लावला असता आपण एका जातीचे नाही, असे म्हणून तिला भेटण्याचे टाळू लागला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तरुणी हवालदिल झाली. पीडित महिलेनं लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सुरज भारत नलावडे  याच्यावर बलात्कार व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच पळून गेलेल्या आरोपी सुरजचा पोलीस शोध घेत आहेत. 

हैदराबाद एन्काऊंटर: मानवाधिकार आयोगाने दिले चौकशीचे आदेश

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:A man was made to marry his girlfriend at a hospital in Pune escape from the hospital soon after the wedding