पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धावत्या रेल्वेला थांबविण्यासाठी विनाकारण चेन ओढण्याच्या पुण्यात ८५ घटना

रेल्वे (संग्रहित छायाचित्र)

मध्य रेल्वेच्या पुणे विभागात विनाकारण धावत्या रेल्वेतील चेन ओढून गाडी थांबविल्याच्या सुमारे ८५ घटना दोन महिन्यांत घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी ५८ जणांना अटक केली आहे. १ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर या कालावधीमध्ये या घटना घडल्या आहेत.

आता राहुल आणि प्रियांका गांधींनी लोकांना केलं हे आवाहन

रेल्वे पोलिस दलातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळी धावत्या गाडीतील चेन ओढतात. यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम होतो. अनेकवेळा गाडीला पुढील स्थानावर पोहोचण्यास उशीर होतो. 

रेल्वे पोलिस दलाचे पुणे विभागाचे आयुक्त अरूण त्रिपाठी म्हणाले, विनाकारण धावत्या रेल्वेतील चेन ओढण्याच्या दररोज सहा ते आठ घटना घडत होत्या. त्याचा विपरित परिणाम रेल्वेसेवेवर होत होता. त्यामुळेच आम्ही विनाकारण चेन ओढणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची मोहिम सुरू केली. आम्ही जेव्हापासून कारवाई सुरू केली. तेव्हापासून या घटना खूप कमी झाल्या आहेत. आता दिवसाला एक किंवा दोनच घटना घडत असल्याचे दिसते.

रेल्वेतील चेन ओढण्याच्या घटना रोखण्यासाठी आम्ही एकूण तीन पथके तयार केली आहेत. ही पथके रेल्वेसेवेवर लक्ष ठेवतात. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साह्याने आरोपींना पकडण्याचे काम केले जाते, असे अरूण त्रिपाठी यांनी सांगितले.

नुसत्या आडनावाने कोणी ठाकरे होत नाही, अमृता फडणवीसांची टीका

आरोपींना पकडल्यानंतर त्यांना रेल्वे न्यायालयापुढे उभे केले जाते. धावत्या रेल्वेतून उतरण्यासाठी गाडीतील चेन ओढणे हे अत्यंत घातक आहे. यामुळे रेल्वेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते, असेही त्यांनी सांगितले.

पुण्यातून दररोज १५० रेल्वे पुढे जात असतात. सुमारे एक लाख प्रवासी पुणे स्थानकावरून रोज प्रवास करीत असतात. धावत्या रेल्वेतील चेन विनाकारण ओढल्याचे सिद्ध झाल्यास दोषीला एक हजारापर्यंतचा दंड किंवा महिन्याचा कारवास यापैकी शिक्षा न्यायालयाकडून दिली जाऊ शकते.