पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणे विभागात कोरोना बाधित ७२६ रुग्णः डॉ. दीपक म्हैसेकर

डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ७२६ झाली असून विभागात ८२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टिव रुग्ण ५९१ आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण ५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १५ रुग्ण  गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

सॅनिटेशन डोम, टनेलचा वापर न करण्याच्या सरकारच्या सूचना

विभागात ७२६ बाधित रुग्ण असून ५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात ६६६ बाधीत रुग्ण असून ४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात ११ बाधीत रुग्ण असून २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात १५ बाधीत रुग्ण असून २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात २७ बाधीत रुग्ण असून कोल्हापूर जिल्हयात ७ बाधीत रुग्ण आहेत. 

अमेरिका एक-एक मृत्यूचा बदला घेणार?, ट्रम्प यांनी दिली चीनला धमकी

आजपर्यंत विभागामध्ये एकूण ९ हजार ४३ नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी ८ हजार ३०४ चा अहवाल प्राप्त आहे. ६८४ नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी ७ हजार ५८६ नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून ७२६ चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

राज्यातील ९५ टक्के चाचण्या निगेटिव्हः उद्धव ठाकरे

आजपर्यंत विभागामधील ४१ लाख २३ हजार ७०८ घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्या अंतर्गत १ कोटी ५५ लाख ६४ हजार ४७८ व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी ८१९ व्यक्तींना  अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.