पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात गॅस सिलेंडरचा स्फोट; ६ महिन्यांच्या बाळासह आई-वडील गंभीर जखमी

पुण्यात गॅस सिलेंडरचा स्फोट

पुण्यामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन सहा महिन्याच्या बाळासह आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. पुण्याच्या खराडी येथील संभाजीनगरमध्ये ही घटना घडली. गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घराला आग लागली. येरवडा अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. सिलेंडर स्फोटामुळे आसपासच्या चार घरांचे देखील नुकसान झाले आहे. 

 

'दहा रुपयाच्या थाळीसोबत २० रुपयांची बिसलेरी पिणारा गरीब माणूस'

संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या शंकर भवाळे (२८ वर्ष) यांच्या घरामध्ये ही घटना घडली आहे. शंकर भवाळे यांनी रविवारी इंडियन गॅस कंपनीची नविन शेगडी आणि सिलेंडर विकत घेतला होता. सोमवारी सकाळी शंकर यांची पत्नी आशा भवाळे (२२ वर्ष) या पाणी तापवण्यासाठी गेल्या असता सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये शंकर भवाळे, आशा भवाळे आणि त्यांची ६ महिन्याची मुलगी स्वराली गंभीर जखमी झाली. 

सात क्षेत्रांत साडेतीन कोटी लोक बेरोजगार, प्रियांका गांधींचा हल्ला

या घटनेची माहिती कळताच खराडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. पोलिसांनी गॅस सिलेंडर ताब्यात घेतला आहे. गंभीर जखमी झालेल्या तिघांना देखील नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शंकर भवाळे मजूरीचे काम करतात. त्यांच्या सहा महिन्याच्या मुलीची प्रकृती गंभीर आहे. 

चीनमध्ये भीषण परिस्थिती; कोरोनामुळे रात्रीत २४ जणांचा मृत्यू