राज्यात कोरोना विषाणूग्रस्त रुग्णांचा आकडा ३१ वर गेला आहे. रात्री उशिरा पिंपरी-चिंचवड येथील ५ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये ३ महिला आणि २ पुरुषांचा समावेश आहे. यातील चौघांचा दुबईहून परतलेल्या प्रवाशांशी संपर्क झाला होता. तर एक २१ वर्षीय तरुण थायलंडला जाऊन आला होता, असे सांगण्यात येते. या नव्या ५ रुग्णांमुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३१ झाली आहे. देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. पुणे १५, मुंबई ५, कामोठे पनवेल, नवी मुंबई, कल्याण, ठाणे, नगर येथे प्रत्येकी १, यवतमाळमध्ये २ व नागपुरात ४ रुग्ण आढळले आहेत.
सौदीतून परतलेल्या कोरोना विषाणूचा संशयित रुग्णाचा बुलडाण्यात मृत्यू
Public Health Department, Maharashtra: 5 more people found positive in Pimpri-Chinchwad today taking total tally of positive cases in Pune to 15. Maharashtra state tally reaches 31. #Coronavirus
— ANI (@ANI) March 14, 2020
दरम्यान, उपचार वा चाचणी अहवालाची प्रतीक्षा न करता मेयो रुग्णालयातून पळून जाणाऱ्या ४ संशयित रुग्णांवर महाराष्ट्र राज्य साथरोग प्रतिबंधक कायदा १९९७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे चौघांचेही वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
राज्यातील सर्व मॉल्स बंद राहणार, सरकारची घोषणा
दुसरीकडे अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयातील कोरोनाचे तीन संशयित रुग्ण पळून गेल्याचे शनिवारी समोर आले. या सर्वांना वेगळे ठेवण्यात आले होते. तेथून ते पळून गेले. शोध मोहीम राबवल्यानंतर तिघेही सापडले. त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल केले आहे.
राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर