पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिरुरमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट; ४ दुकानं आणि एटीएम फोडले

शिरुरमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट

पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. मध्यरात्रीच्यावेळी सर्व गाढ झोपेत असताना चोऱ्या केल्या जात असल्याने नागरिकांच्यामध्ये भितीचे वातावरण आहे. शिरुर तालुक्यातल्या टाकळी गाजी गावामध्ये चोरट्यांनी ४ दुकानं फोडली. तर मलठण गावामध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत. 

एअरसेल प्रकरणात चिदंबरम आणि त्यांच्या मुलाला दिलासा

शिरुर तालुक्यात यापूर्वी देखील अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी चोरट्यांनी जांबूत गावामध्ये तीन दुकानं फोडली. त्यापूर्वी पिंपरखेड गावातील सहा दुकानं फोडली. चोरी करताना चोरटे सामान्य नागरिकांवर हल्ला करत आहेत. २६ ऑगस्ट रोजी केंदुर आणि रावडेवाडी या गावामध्ये चोरीची घटना घडली होती. चोरट्यांनी केंदुर येथे वयोवृध्द दाम्पत्यांना मारहाण करत चोरी केली आहे. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले होते. 

पेट्रोल-डिझेलवरील गाड्यांवर बंदीचा विचार नाही - गडकरी

या चोरीच्या घटनांमुळे शिरुर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत चालल्यामुळे या चोरट्यांना पकडण्याचे पुणे ग्रामिण पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. या चोरट्यांना पकडण्याठी पुणे पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांच्या टीम नेमल्या आहेत. 

चिदंबरम यांना धक्का, अटकपूर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला