पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणे विभागात ३ हजार क्विंंटल अन्नधान्याची आवकः दीपक म्हैसेकर

पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर

सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे ३० हजार ५०८ क्विंटल अन्नधान्याची तर १४ हजार ६३ क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात ३ हजार ९८१ क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाट्याची आवक १५ हजार ८४० क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

तबलिगींच्या मुद्यावरुन राज्याच्या गृहमंत्र्यांचा अमित शहांवर निशाणा

पुणे विभागात ८ एप्रिल २०२० रोजी १०१.०१७ लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून २३.००८ लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

पुणे विभागात ६६ हजार १२३ स्थलांतरित मजुरांची सोय

आमदारांच्या वेतनात ३० टक्के कपात, कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय

सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत ११७ कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत ५८२ कॅम्प असे पुणे विभागात एकुण ६९९ रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये ६६ हजार १२३ स्थलांतरित मजूर असून १ लाख २० हजार ४०३ मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:3 thousand quintal grain and 14 thousand quintal vegetables in pune division amid coronavirus outbreak says pune divisional commissioner deepak mhaisekar