पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात पोलिसाच्या गाडीने चिमुरडीला चिरडले

चिमुकलीचा मृत्यू

पुण्यामध्ये साडेतीन वर्षाच्या चिमुकलीला पोलिसाच्या गाडीने चिरडल्याची घटना समोर आली आहे. पुण्याच्या उत्तमनगर भागामध्ये बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. या घटनेमध्ये चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसाविरोधात उत्तरमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काँग्रेसला माझ्या सेवेची गरज नाही, संजय निरुपम यांची जाहीर नाराजी 

उत्तमनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सतिश डहाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'दिव्या चव्हाण असं मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. ती उत्तमनगर परिसरामध्ये राहते. याच परिसरामध्ये राहणारे हवालदार तांडले बुधवारी संध्याकाळी चहा पिण्यासाठी घरी आले होते. त्यांनी घरासमोर गाडी उभी केली होती. या गाडीजवळ दिव्या खेळत होती. तांडले चहा घेतल्यानंतर गाडीजवळ आले. त्यांनी गाडी सुरु केली असता एक मुलगी जोरात किंचाळी तेव्हा गाडीखाली कोणीतरी आल्याचे त्यांच्या लक्षात आले.'

तिसऱ्या यादीनंतरही भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या पदरी निराशाच

बुधवारी संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास ही घटना घडली. चिमुरडीचा आवाज येताच तांडले गाडीतून खाली उतरले. जखमी झालेल्या दिव्याला घेऊन ते माई मंगेशकर रुग्णालयात गेले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच दिव्याला मृत घोषित केले. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात हवालदार तांडले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

एकनाथ खडसे माझ्या संपर्कात - शरद पवार