पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केली कमाल!, ७७ आरोपी अटकेत

पुण्यातील सीसीटीव्ही कॅमेरे

चोरी, दरोडे, गळ्यातील चेन हिसकावणे या स्वरुपाच्या सुमारे ६३ गुन्ह्यांचा पुणे पोलिसांनी शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साह्याने छडा लावला आहे. या प्रकरणी ७७ आरोपींना अटकही करण्यात आली आहे. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी लावलेल्या २९ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीमुळेच हे शक्य झाले. 'सीसीटीव्ही वॉच प्रोजेक्ट' या उपक्रमांतर्गत दुकानदारांनी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे या आरोपींविरोधात पोलिसांना सबळ पुरावेच मिळाले आहेत.

शिवसेना सोडून नारायण राणे यांनी चूक केली - गडकरी

गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे म्हणाले, सीसीटीव्ही वॉच उपक्रमामुळे अनेक गुन्ह्यांचा छडा लावणे पोलिसांना शक्य झाले. त्याचबरोबर पोलिसांकडे संबंधित आरोपींविरोधात पुरावे मिळणे शक्य झाले. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे आम्ही आतापर्यंत ६३ गुन्ह्यांचा शोध लावला असून, ७७ जणांना अटक केली आहे. गेल्या ३ ते ४ महिन्यांत चोरट्यांकडून तब्बल ६२,७४,००० रुपयांचा ऐवज आम्ही हस्तगत केला आहे.

पोलिसांच्या सांगण्यानुसार दुकानदार त्यांच्या दुकानाच्या बाहेरील बाजूस हे सीसीटीव्ही कॅमेरे लावतात. यामुळे संबंधित दुकानाच्या भागामध्ये २४ तास लक्ष ठेवणे शक्य होते. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत शहरात वेगवेगळ्या ठिकाणी २९ हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून, ते सर्व एकमेकांशी जोडले गेले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेऱ्याची स्थाननिश्चितीही करण्यात आली आहे. 

तांत्रिक कारणामुळे मुंबईतील CNG पुरवठा विस्कळीत, वाहनांना फटका

या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे एखाद्या ठिकाणी गुन्हा घडल्यानंतर पोलिस लगेचच त्या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण त्यांच्या मोबाईलवर पाहू शकतात. या कॅमेऱ्यांमुळे मोबाईल चोरी, विनयभंग या सारखे गुन्हेही रोखणे पोलिसांना शक्य झाल्याचे अशोक मोराळे यांनी सांगितले.