पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात पब्जी खेळताना तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू

पुण्यात पब्जी खेळताना तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू

पब्जी गेम खेळताना एका २७ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली. हर्षल देविदास मेमाणे (वय २७, रा. रावेत, पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे. हर्षल हा गेल्या काही दिवसांपासून घरीच राहून पब्जी गेम खेळत होता.

युती तोडल्याचा शिवसेनेला पश्चाताप होणार: देशमुख

हर्षल हा शुक्रवारी त्याच्या घरी पब्जी गेम खेळताना अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्याला कुटुंबीयांनी त्वरीत रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी त्याचा मृत्यू झाला. पबजी गेम जास्त खेळल्याने त्याच्यावर ताण येऊन त्याचा मृत्यू झाला असावा असे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले आहे. घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.

सदाभाऊ खोत यांची नव्या पक्षाची घोषणा