पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रुबी हॉल क्लिनिकच्या २५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

कोरोना विषाणू चाचणी (संग्रहित छायाचित्र)

पुण्यामध्ये कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. अशात रुबी हॉल क्लिनिकमधील २५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 'रुबी हॉल क्लिनिकच्या २५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून यामध्ये १९ नर्सचा समावेश आहे. रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोटे यांनी ही माहिती दिली आहे. 

'महाराष्ट्रात साधूंची भगवी वस्त्र रक्ताने भिजली याचे राजकारण करु नका'

१२ एप्रिल रोजी रुबी हॉल क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या एका नर्सला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर या नर्सच्या संपर्कात आलेल्या ३० कर्चमाऱ्यांची कोरोना तपासणी करुन त्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते. सोमवारी रात्री उशिरा त्यांचा तपासणी अहवाल आला. यामध्ये २५ कर्मचाऱ्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोनाची लागण झालेल्या २५ कर्मचाऱ्यांमध्ये १९ नर्सचा समावेश आहे. 

राष्ट्रपती भवनात कोरोनाचा रुग्ण, १२५ कुटुंब क्वारंटाईन

राज्यात कोरोनाचे आणखी ४७२ नवे रुग्ण आढळले असून आणखी ९ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४६७६ झाला आहे तर मृतांचा आकडा २३२ झाला आहे. राज्यात मुंबईनंतर राज्यात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्यातही पुणे शहर व पिंपरी-चिंचवडमधील रुग्णांची संख्या जास्त आहे. 

देशात २४ तासांत कोरोनाचे १३३६ नवे रुग्ण, ४७ जणांचा मृत्यू

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:25 hospital staff including 19 nurses tested positive for covid 19 in punes ruby hall clinic