पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात २३ वर्षीय युवकावर ऍसिड हल्ला

संग्रहित छायाचित्र

पुण्यात वैयक्तिक वादातून एका २३ वर्षांच्या मुलावर ऍसिड फेकण्यात आल्याने खळबळ उडाली. सदाशिव पेठेमध्ये ही घटना घडली. रोहित थोरात असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

रोहित थोरात याच्या आईने या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी रोहितसोबतच्या एका तरुणावर संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी पोलिस गेल्यावर त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबारही केला. मोठ्या प्रयासाने पोलिसांनी त्याला जेरबंद केले. आरोपी स्पर्धा परीक्षांची तयारी करीत होता, अशी माहिती पुढे आली आहे. त्याच्या संपूर्ण अंगावर आणि चेहऱ्यावर जळल्याच्या खुणाही आहेत. पोलिस अधिक तपास करीत आहेत.