पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात शिवशाही बस ५० फूट दरीत कोसळली; दोघांचा मृत्यू

शिवशाही बसला अपघात

पुण्यामध्ये शिवशाही बसला भीषण अपघात झाला आहे. कात्रजजवळ शिवशाही बस ५० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातामध्ये दोन प्रवाशांचा मृत्यू झाला तर २४ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पुणे पोलिस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य केले.

पदभार स्वीकारल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात आधी केले हे काम

शिवशाही बस पुण्यावरुन सांगलीच्या दिशेने जात होती. या बसमध्ये ४० प्रवासी होते. कात्रजचा जूना घाट संपल्यावर शिंदेवाडी हद्दीत शिवशाही बस दरीत कोसळली. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला आहे. दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर २४ प्रवासी जखमी झाले आहेत. पोलिसांनी स्थानिक नागरीकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघातामध्ये बसचा चक्काचूर झाला आहे.  

'हा सत्ता स्थापनेचा दावा नाही तर दिशाभूल करणारे पत्र'