पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनामुळे पुण्यात आज २ महिलांचा मृत्यू

कोरोना विषाणू (संग्रहित छायाचित्र)

पुण्यात कोरोना विषाणूवर उपचार घेत असलेल्या दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. या दोघांवर ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. पुण्यातील मृतांची संख्या ३१वर गेली आहे. 

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा १८९५ वर, १३४ नव्या रुग्णात भर

पुण्यात रविवारी सकाळपासून पाच तासांच्या आत दोघांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. ५८ वर्षाच्या महिलेला ९ एप्रिलला ससूनमध्ये दाखल करण्यात आले होते. या महिलेला लठ्ठपणा आणि रक्तदाब असा आजार होता. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. दुसरी ५६ वर्षीय महिला सोमवार पेठेतील रहिवासी होती. या महिलेला रक्तदाबाचा त्रास होता. ५ एप्रिलला या महिलेला ससूनमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कोरोनामुळे एकट्या ससून रुग्णालयात २२ जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील एकूण मृतांची संख्या ३१वर पोहोचली आहे. 

लॉकडाऊनः कर्फ्यू पास मागणाऱ्या पोलिसाचा हातच छाटला

दरम्यान, राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असून रुग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. आज कोरोनाचे आणखी १३४ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १८९५ वर पोहचला आहे. तर आतापर्यंत राज्यात १२७ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. 

लॉकडाऊनः मोदी सरकार देशाची तीन झोनमध्ये विभागणी करण्याची शक्यता