पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पिंपरी-चिंचवडमध्ये लहान मुलावर दोन अल्पवयीन मुलांकडून लैंगिक अत्याचार

संग्रहित छायाचित्र

सहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपातून पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला. पीडित मुलाच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ही कारवाई केली. यातील एक आरोपी १३ वर्षांचा तर दुसरा १२ वर्षांचा आहे.

दाभोलकर हत्या प्रकरणः पुनाळेकर, भावेला १ जूनपर्यंत सीबीआय कोठडी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा गेल्या १० ते १२ दिवसांपासून सतत आजारी होता. शनिवारी आईने त्याला जेवायला दिल्यावर तो पाय पसरून बसला होता. आईने त्याला मांडी घालायला सांगितली. पण तसे करता येत नाही, असे त्याने सांगितल्यावर संपूर्ण प्रकरणाचा आईपुढे उलगडा झाला. आईने लगेचच त्याला यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयात नेले. पण तेथे डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्याला पुढील उपचारांसाठी ससून रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. आईने लगेचच मुलाला ससून रुग्णालयात नेले. यावेळी एका अज्ञाताने ही घटना फोनवरून पिंपरी-चिंचवड पोलिसांना सांगितली. पोलिसांनी लगेचच ससूनमध्ये जाऊन संबंधित आईची भेट घेतली आणि काय घडले आहे, याची चौकशी केली. 

जीममधील अतिव्यायामाने पुण्यातील तरुणाची किडनी निकामी

पीडित मुलाची आई गृहिणी असून, वडिल कामगार आहेत. आरोपी मुलेही याच परिस्थिती वाढलेली आहेत. आरोपी आणि पीडित दोघेही एकाच भागात राहतात. 
रविवारी न्यायालयाला सुटी असल्याने पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या पालकांना नोटीस बजावली आहे. सोमवारी दोन्ही मुलांना घेऊन पोलिस ठाण्यात हजर होण्यास सांगितले आहे. या दोन्ही मुलांना ताब्यात घेऊन त्यांना अल्पवयीनांसाठीच्या न्यायालयासमोर हजर करण्यात येईल, असे भोसरी पोलिस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी सांगितले.