पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमृतांजन पूल अखेर इतिहासजमा, ब्लास्टिंग करून पूल पाडला

अमृतांजन पूल पाडला

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावरील १९० वर्षे जुना अमृतांजन पूल अखेर इतिहास जमा झाला आहे. द्रुतगती मार्गाला अडथळा ठरणाऱ्या पुलाच्या चारही खांबांना एकाचवेळी ब्लास्टिंग करुन तो पाडण्यात आला. रविवारी संध्याकाळी सव्वासहाच्या दरम्यान हा पूल जमिनदोस्त करण्यात आला. पुढील दोन दिवसात रस्त्यावरील मातीचे ढिग आणि दगड बाजुला केले जाणार आहेत.

मुंबईतील 'या' ६ विभागात कोरोनाचे ५३% रुग्ण

अमृतांजन पुलावरील पाईपलाईन हलविल्यानंतर  रविवारी सकाळपासून पुलाच्या दगडी खांबांना सुरुंगाची दारु भरण्यासाठी होल करण्याचे काम सुरु होते. प्रत्येक खांबाला पायाजवळ ४५ होल करण्यात आले होते. दिवसभराचे हे काम पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी सव्वासहा वाजता ब्लास्टिंग करुन पूल पाडण्यात आला. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून नियुक्त केलेल्या नवयुग टीमचे प्रमुख अनिल कुमार आणि त्यांच्या टीमने हे काम केले.

कनिकाचा दुसरा रिपोर्टही निगेटिव्ह, रुग्णालयातून डिस्चार्ज

अमृतांजन पूल पाडण्यात येणार असल्याने  पुण्याकडे जाणारी सर्व वाहने अंडा पाँईट येथून जुन्या मार्गाने तर मुंबईकडे जाणारी वाहने लोणावळा एक्झिट येथून लोणावळा शहरातून वळविण्यात आली होती. ब्लास्टिंगच्या वेळी दोन्ही बाजुची वाहतूक थांबविण्यात आली होती. ४ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान हा पूल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पाडण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. 

अमेरिकेत कोरोनामुळे २४ तासांत १२०० जणांचा मृत्यू

हा पूल धोकादायक झाल्याने त्याच्यावरुन वाहतूक अनेक वर्षापासून बंद करण्यात आली होती. या पुलाच्या खालून मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जातो. या पुलामुळे मार्गावर वळण आले होते आणि रस्ता अरुंद झाला होता. यामुळे वारंवार याठिकाणी अपघात होत असल्याने तो वाहतुकीसाठी अडचणीचा ठरत होता. मागील तीन वर्षांपासून हा पुल पाडण्याच्या हालचाली सुरु होत्या. अखेर हा पूल इतिहास जमा झाला आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात मास्कशिवाय 'नो एन्ट्री'