पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात सावत्र बापाने गळा दाबून केली मुलीची हत्या

पिंपरीत तरुणाची हत्या

पुण्यातील दापोडीमध्ये सावत्र वडिलांनी १५ वर्षाच्या मुलीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आई-वडिलांमध्ये भांडण झाल्यानंतर सावत्र वडिलांनी मुलीची गळा दाबून हत्या केली. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, लैंगिक अत्याचारानंतर मुलीची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे. 

 

राहुल गांधींच्या 'रेप इन इंडिया' कमेंटवरून संसदेत गदारोळ, भाजप आक्रमक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि त्याच्या पत्नीमध्ये सतत वाद होत असे. यातच आरोपी पत्नी आणि मुलींना मारहाण करत असे. तसंच, मुलींचे प्रेमप्रकरण असल्याच्या संशयावरून देखील तो त्यांना सतत मारहाण करत असे. याप्रकरणी मुलीच्या आईने भोसरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. माझ्या मुलींना हात लावायचा नाही असे महिला वारंवार आरोपीला सांगत असे. विजय बबन चव्हाण (४४ वर्ष) असे आरोपीचे नाव असून तो रिक्षाचालक आहे. 

माफी मागणार नाही, राहुल गांधी आपल्या कमेंटवर ठाम

गुरुवारी आरोपीचे पत्नीसोबत भांडण झाले. त्यानंतर आरोपीने मुलीची हत्या केली. २००७ पासून हे जोडपे मुलींसोबत एकत्र राहत होते. याप्रकरणी आरोपी वडिलांविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येनंतर आरोपी फरार झाला आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे. दरम्यान, हत्या झालेल्या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी यशवंत चव्हाण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. 

निर्भया प्रकरण: दोषींच्या फाशीवरील सुनावणी पुढे ढकलली