पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्य सरकारकडून पुणे विभागाला १५ कोटींचा आपत्ती निधी

दीपक म्हैसेकर

महाराष्ट्रात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पुण्यामध्ये कोरोना विषाणूचे सर्वात जास्त रुग्ण आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी राज्य सरकारकडून पुणे विभागाला १५ कोटींचा आपत्ती निधी देण्यात आला आहे. हा निधी वेगवेगळ्या जिल्ह्यांना देण्यात येणार असल्याचे सांगितले.  

पुण्यातील जमाव बंदीच्या प्रश्नावर आरोग्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण

दीपक म्हैसेकर यांनी सांगितले की, पुण्यामध्ये गेल्या २४ तासांत एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. आतापर्यंत पुण्यामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा १६ झाला आहे. तर गेल्या २४ तासांमध्ये २७ कोरोना संशयितांची टेस्ट निगेटिव्ह आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसंच, परदेशातून पुण्यात आलेल्या सर्व प्रवाशांची तपासणी होणार आहे. रविवारी ९० जण परदेशातून आले होते त्यापैकी ७ जणांना त्रास होत होता. त्या सर्वांची नायडू रुग्णालयात तपासणी केली जाणार आहे.

येस बँकेवरील निर्बंध बुधवारी सहा वाजल्यापासून मागे 

दीपक म्हैसेकर यांनी पुढे असे देखील सांगितले की, प्रशासनाकडून शहरातील घरांचे सर्वेक्षण सुरु आहे. पुणे महापालिकेच्या १२५ तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ५० टीम घरोघरी जाऊन तपासणी करत आहेत. आतापर्यंत १५,८०३ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तसंच, पुण्यातील सर्व कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची परवानगी द्यावी असे आदेश दिले असल्याचे देखील दीपक म्हैसेकर यांनी सांगितले. 

भीमा-कोरेगाव हिंसाचार : तेलतुंबडे, नवलखा यांच्या अडचणीत वाढ