पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणे विभागातील १३५ कोरोना बाधित रुग्ण बरे

पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर

पुणे विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ८९६ झाली असून विभागात १३५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण ७०० आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण ६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १२ रुग्ण  गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

ब्राव्हो मुकेश!, फेसबुक-जिओ डीलवर आनंद महिंद्रांचे टि्वट

पुणे विभागात ८९६ बाधित रुग्ण असून ६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात ८१३ बाधीत रुग्ण असून ५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात १६ बाधीत रुग्ण असून २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात ३० बाधीत रुग्ण असून ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात २७ बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर  जिल्हयात १० बाधीत रुग्ण आहेत. 

पुण्यात ३ लाख ट्रिपल लेअर सर्जिकल मास्कची खरेदी

आजपर्यत विभागामध्ये एकुण १० हजार ७१७  नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी १० हजार २१०  नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे तर ५०७ नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी ९ हजार २६४ नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून ८९६ चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

VIDEO: धान्य वाटपावरुन वाद, पोलिसांकडून नागरिकांना चोप

आजपर्यंत विभागामधील ४५ लाख ८६ हजार ६१२ घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत १ कोटी ७६ लाख ३६ हजार ६७३ व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी ८६५ व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.