पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये अडकले १३ जण; अग्निशमन दलाकडून सुटका

लिफ्टमध्ये अडकले १३ जण

पुण्यातल्या हडपसर येथे अचानक लिफ्ट बंद पडल्यामुळे १३ महिला अडकल्या होत्या. या महिलांची तब्बल तीन तासांनंतर अग्निशमन दलाकडून सुटका करण्यात आली आहे. हडपसरच्या मगरपट्टा भागामध्ये असलेल्या नोबेल रुग्णालयात ही घटना घडली आहे. 

आमदार संग्राम थोपटेंचे समर्थक आक्रमक; पुण्यातील काँग्रेस भवनाची तोडफोड

नोबेल रुग्णालयातील आयनॉक्स शाखेत ही घटना घडली आहे. चौथ्या मजल्यावरुन खाली येत असताना अचानक लिफ्ट बंद पडली आणि १३ महिला कर्मचारी त्यामध्ये अडकल्या. या घटनेमुळे रुग्णालयामध्ये एकच गोंधळ उडाला. तात्काळ अग्निशमन दलाला फोन करण्यात आला. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत या महिला कर्मचाऱ्यांची सुटका केली.

भारताकडून चांद्रयान-३ची घोषणा, २०२० मध्येच पुन्हा मोहिम 

लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माणसं आल्यामुळे लिफ्ट बंद पडली. ७ माणसांची क्षमता असताना सुध्दा लिफ्टमध्ये १३ जण होते. त्यामुळे लिफ्टच्या रोपचा बेल्ट घसरुन लिफ्ट बंद पडली असल्याचे सांगितले जात आहे. लिफ्टमध्ये तीन तास अडकल्यामुळे सर्वांना जीव गुदमरला होता. पंखे लावून अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य करत या सर्वांची सुटका केली. 

अर्थमंत्र्यांकडून नवीन वर्षाचे गिफ्ट; १०२ लाख कोटींच्या योजनांची