पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यातील पर्वती येथे गाड्यांना आग; ७ गाड्या जळून खाक

पुण्यात गाड्यांना आग

पुण्यामध्ये गाड्यांना आग लागल्याची घटना समोर आली आहे. पर्वती येथे पार्किंमध्ये उभ्या असलेल्या ११ गाड्यांना आग लागली. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून या आगीमध्ये गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग अटोक्यात आणली.

दिल्लीला हादरवण्यासाठी जैशने 'या' संघटनांशी केली हात मिळवणी 

पर्वती येथे मध्यरात्री दिडच्या समुरास गाड्यांना अचानक आग लागली. सानेगुरुजी शाळेसमोर  इमारतीच्या पार्किंमध्ये उभ्या असलेल्या ११ गाड्यांना आग लागली. या आगीमध्ये ६ दुचाकी आणि एक रिक्षा जळून खाक झाली. तर ४ दुचाकींना आगीची झळ लागली.

आरेतील वृक्षतोड रोखण्यासाठी शिवसेना सुप्रीम कोर्टात जाणार

दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. या आगीमध्ये गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, गाड्यांना आग कशामुळे लागली याचा शोध घेतला जात आहे.

नाशिक जिल्ह्यात अंगावर वीज पडून तिघांचा मृत्यू