पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिरुरमधून फरार झालेले १० जण मरकजमध्ये सहभागी झाले नव्हते: म्हैसेकर

विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर

राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. अशामध्ये होम क्वारंटाइन केलेल्यांनी बाहेर फिरु नये असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र पुणे जिल्ह्यातील शिरुर येथे होम क्वारंटाईन केलेले १० जण फरार झाल्याची घटना समोर आली आहे. फरार झालेले १० जण निजामुद्दीन येथील मरकजमध्ये सहभागी झाल्याच्या वृत्तामुळे एकच खळबळ उडाली होती. अखेर विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी यांनी या वृत्ताबाबत खुलासा केला आहे. 

कोविड-१९ : इस्त्रायल पंतप्रधानांची PM मोदींकडे सहकार्याची विनंती

दीपक म्हैसकर यांनी सांगितले की, शिरुरमधून जी १० जण फरार झाले आहेत ते २३ फेब्रुवारीला दिल्लीहून पुण्यामध्ये आली होती. पुण्यामध्ये ते ६ मार्चपर्यंत होती. त्यानंतर ६ मार्चलाच ही लोकं शिरुरमधे शिफ्ट झाली. शिरुरच्या एका मशीदीमध्ये ते थांबलेले होते. १ एप्रिलला जेव्हा दिल्लीची निजामुद्दीनची घटना उघडकीस आली त्यानंतर त्यांना होम क्वारंटाइनचे  शिक्के मारण्यात आले होते. मात्र शुक्रवारी ते पळून गेले. वैद्यकीय औषध घेवून जाणा-या ट्रकमधून ते फरार झाले असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. 

नवी मुंबई : लॉकडाऊनच्या काळात मद्य विक्रीचा प्रकार उघडकीस

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचे मोबाईल नंबर आमच्याकडे आहेत. सीडीआरवरून त्यांचे  ट्रेसिंग करण्यात येत असल्याचे म्हैसेकरांनी सांगितले. दरम्यान, निजामुद्दीन येथील मरकजमध्ये झालेल्या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांची जी यादी आम्हाला देण्यात आली आहे. त्यामध्ये या व्यक्तींची नाव नव्हती आणि ही त्यापैकी आहेत असे आमच्या रेकॉर्डवरून स्पष्ट होत नाही, असे देखील त्यांनी सांगितले. तसंच, ही लोकं तबलीगीशी संबंधीत आहेत हे खरे आहे. आम्ही त्यांचा शोध घेत असल्याचे देखील म्हैसेकर यांनी सांगितले. 

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ४९० वर; ५० रुग्णांना डिस्चार्ज