पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणे विभागात १ लाख १८ हजार मजुरांच्या भोजनाची सोयः डॉ. दीपक म्हैसेकर

विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर

सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत ११४ कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत ५७१ कॅम्प असे पुणे विभागात एकूण ६८५ रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये ६४ हजार ३२ स्थलांतरित मजूर असून १ लाख १८ हजार ३१२ मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

देशातील २७४ जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव, २६७ रुग्ण झाले बरे

पुणे विभागातील गरजू तसेच रोजंदारीवर असलेल्या नागरिकांना सामाजिक संस्था, सेवाभावी संस्थांकडून तसेच दानशूर व्यक्तींकडून दहा जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यासाठी यंत्रणा उभारण्याच्या सूचना विभागातील सर्व जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांना दिल्या आहेत, अशी माहिती डॉ. म्हैसेकर यांनी दिली.

मोदींची प्रणव मुखर्जी, मनमोहन सिंग, सोनियांसह बड्या नेत्यांशी चर्चा

दरम्यान, भारतीय रेल्वेमार्फत पूर्वतयारी म्हणून कोरोना बाधित रुग्णांसाठी आयसोलेशन कंपार्टमेन्ट वार्ड तयार केले जात आहेत. पुण्यातील घोरपडी येथील कोच रिपेअर डेपो येथे कोचमध्ये साईसुविधा तयार करण्याचे काम गतीने सुरू आहे, विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी आयसोलेशन सुविधेची प्रत्यक्ष पाहणी करुन रेल्वेच्या तयारीचा आढावा घेतला.

कोरोनाशी लढा : तैवानच्या त्या मास्टर प्लानमुळे वाचले लोकांचे प्राण

भारतीय रेल्वेच्या माध्यमातून कोवीड-१९ रुग्णांसाठी आयसोलेशन कंपार्टमेंट वॉर्ड तयार करण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक बोगीत १६ ते १८ रुग्णांची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. पुणे विभागात पहिल्या टप्प्यात ५० कोच पुरविण्यात येणार आहे. यामध्ये ८०० ते ९०० रुग्णांची व्यवस्था होऊ शकेल. रेल्वेने या सुविधेत रुग्णांना सुविधा देण्याच्या दृष्टीने आवश्यक बदल केले असून येत्या दोन दिवसांत दोन कोच उपलब्ध होतील, उर्वरित कोच आठ दिवसांत उपलब्ध होतील, असेही सांगून रेल्वेने निर्माण केलेल्या कोच सुविधेबाबत डॉ. म्हैसेकर यांनी समाधान व्यक्त केले.