पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरील अपघातात २००८ पासून १,४९३ मृत्यू

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या अपघातात  २००८ पासून जीव गमावलेल्या व्यक्तींची एकूण आकडेवारी सेव्ह लाईफ या  संस्थेनं जाहीर केली आहे. २०१८ पासून ते आतापर्यंत मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या अपघातात एकूण १ हजार ४९३ लोक मृत्युमुखी पडले आहेत.  २०१९ या वर्षांत मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर एकूण ६७ भीषण अपघात झाले. या अपघातात ८६ लोकांचा मृत्यू झाला. 

... म्हणून मुंबई पोलिसांनी तब्बल १२५३७ पोस्ट सोशल साईट्सवरून हटविल्या

मुंबई  आणि पुणे या दोन महत्त्वपूर्ण शहरांच्या मध्ये असलेल्या ९४. ६ किलोमीटरच्या पट्ट्यात अपघात झाले आहेत. २०२१ पर्यंत एक्स्प्रेस वेवर होणाऱ्या अपघातांची संख्या कमी असेल असा विश्वासही या संस्थेनं व्यक्त केला. त्यादृष्टीनं ही संस्था प्रयत्न करत आहे. याच एक्स्प्रेसवेवर गेल्या आठवड्यात ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या गाडीला अपघात झाला होता. या अपघातात शबाना आझमी आणि त्यांच्या गाडीचा चालक गंभीर जखमी झाला होता.

अबब ! सिद्धिविनायक मंदिराला ३५ किलो सोन्याचे दान

सेव्ह लाईफ संस्थेच्या मते २०१६ मध्ये १५१, २०१७ मध्ये १०५ आणि  २०१८ मध्ये ११० आणि २०१९ मध्ये  अपघातामुळे ८६ मृत्यू झाले आहेत. हायवे सेफ्टी पेट्रोलच्या माहितीनुसार २०१९ मध्ये अमृतांजन पूल लोणावळा आणि किवळे एक्झिट दरम्यान घडलेल्या अपघातात ३५ जणांचा मृत्यू झाला होता.