वृषभ राशीची व्यक्ती ही सर्वात विश्वासू आणि निष्ठावान व परिपूर्ण जीवनसाथी बनू शकते, कार्यक्षेत्रात देखील अशी व्यक्ती परिपूर्ण मित्र, निष्ठा आणि विश्वासार्हतेने वागणारा सहकारी असू शकते. मात्र, ज्योतिषशास्त्रानुसार, या राशीची आणखी एक वेगळी बाजू देखील आहे. चला जाणून घेऊया त्याबद्दल…
(HT File Photo)मी क्षमा का मागावी?: वृषभ राशीत ही वृत्ती कधीकधी दिसून येते. तुम्ही त्यांच्याकडून माफी मागण्याची अपेक्षा करत आहात का? पण, चूक झाली तरी ते कधी क्षमा मागत नाहीत. ते जिद्दी आणि माफी न मागणारे असतात, तुम्हाला हवं असेल, तर या आणि बोला माझ्याशी, असे ते असतात. वृषभ राशीचा असा विश्वास आहे की, त्यांनी जे केले आहे ते योग्य आहे, ज्यामुळे बऱ्याचदा त्यांचे वैयक्तिक संबंध खराब होऊ शकतात किंवा तुटू शकतात.
वृषभ राशीचे लोक कधी भावनिक प्रतिसाद देत नाहीत. त्यांची आंतरिक शांतता त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची असते. स्वत:चे रक्षण करण्याची त्यांची मानसिकता असते. त्यांचा आनंद त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो. स्वसंरक्षणासाठी ते कधीकधी वेगळे होतात किंवा दूर जाण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा आपल्याला त्यांची सर्वात जास्त आवश्यकता असते, तेव्हा ते भावनिकदृष्ट्या अनुपलब्ध होतात. त्यांचे हे वागणे एखाद्या व्यक्तीवर गंभीर आघात करू शकते, परंतु, वृषभेची व्यक्ती अशा परिस्थितीचा सहज सामना करू शकते.
लाक्षणिकभाषेत सांगायचे झाले, तर बैलाला दूर ढकलले तर तो हिंसक आणि उत्तेजित होऊ शकतो. त्याचप्रमाणे जर या राशीच्या लोकांना भडकवले किंवा दूर ढकलले, तर ते उत्तेजित, द्वेषमय होऊ शकतात आणि यामुळे प्रतिशोध देखील घेऊ शकतात.
वृषभ राशीच्या लोकांना चांगलं आयुष्य हवं असतं. त्यांच्याकडे एखादी गोष्ट असेल तर हरकत नाही. मात्र, नसेल तर, त्यांना हेवा आणि मत्सर वाटू लागतो. यामुळे ते आणखी उद्विग्न होतात.
ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीच्या लोकांना लोभ जास्त असतो, कधी कधी ते वाईट मार्ग पत्करू शकतात. कधी कधी त्यांचा लोभ इतका वाढू शकतो की, ज्यामुळे जीवन अधिक चांगले होण्याच्या प्रक्रियेत असलेले त्यांचे आयुष्य आणखी उद्ध्वस्त होते, म्हणून त्यांचा वापर इतरांकडून स्वतःच्या स्वार्थासाठी होण्याची शक्यता जास्त असते.
या लेखात नमूद केलेली सर्व माहिती विविध माध्यमे/ज्योतिषी/पंचांग/प्रवचने/धर्म/धर्मग्रंथ यांच्याकडून संकलित करण्यात आली आहे. माहिती देणे हा आमचा उद्देश आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर हे श्रद्धेवर आणि शास्त्रावर आधारित लेखन आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी त्यात असलेल्या सर्व मुद्द्यांना दुजोरा देत नाही.