जाहिरातीचे चित्रीकरण करत असताना करणार आदित्यशी खरं लग्न, 'पारू' मालिकेत रंजक वळण-zee marathi serial paaru 23rd may 2024 update ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  जाहिरातीचे चित्रीकरण करत असताना करणार आदित्यशी खरं लग्न, 'पारू' मालिकेत रंजक वळण

जाहिरातीचे चित्रीकरण करत असताना करणार आदित्यशी खरं लग्न, 'पारू' मालिकेत रंजक वळण

May 23, 2024 12:38 PM IST
  • twitter
  • twitter
  • 'पारू' मालिकेत सध्या रंजक वळण आले आहे. जाहिरातीचे शुटिंग सुरु असतानाच पारूने खरं लग्न झाल्याचे समजले आहे. आता मालिकेत पुढे काय होणार जाणून घेऊया…
झी मराठी वाहिनीवरील 'पारू' मालिका सर्वांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीला उतरताना दिसत आहे. आता ही मालिका एका रंजक वळणावर पोहोचली आहे. मालिकेतील पारूचे संपूर्ण आयुष्य बदलणार असल्याचे दिसत आहे.
share
(1 / 5)

किर्लोस्करांच्या बिझनेसची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून पारू आजवर उत्तम सहकार्य करत आली आहे, पारुसाठी खूप महत्वाचा दिवस आहे कारण किर्लोस्करांच्या बिझनेससाठी एका भव्य जाहिरातीच चित्रीकरण होत आहे.
share
(2 / 5)

या जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी मंडप सजला आहे, पारूने लग्नाचा जोड घातला आहे, नवरदेवाच्या पोशाखात आदित्य तयार आहे. भटजींनी मंत्र सुरु केले आणि लग्न विधी सुरु झाला आहे. आदित्यने, पारूच्या गळ्यात मंगळसूत्र ही घातलं पण विवाह संपन्न झाला असं बोलायच्या ऐवजी दिग्दर्शकानी शॉट कट केला.
share
(3 / 5)

पारूचे दागिने  काढले गेले, गळ्यातला हार देखील काढला, लाईट्स ऑफ केल्या गेल्या आणि पारूच्या आयुष्यात जसा अंधार झाला. तिला काही कळेनासे झाले. पारूने आपल्या गळ्यातले मंगळसूत्र काढून नाही दिले कारण तिच्यासाठी हे नातं जन्मो जन्मानंतरासाठी  बांधलं गेले आहे.
share
(4 / 5)

पारूच्या आयुष्यात क्षणात नियतीचे फासे फिरले आणि दुःखाचे काटे तिच्या मनात रुतले. काय होईल जेव्हा आदित्य आणि अहिल्यादेवी समोर पारू आपलं हे सत्य ठेवेल. आदित्य पारूला आपल्या पत्नीचा दर्जा देईल? अहिल्या, पारूला आपली सून म्हणून स्वीकारेल ? असे प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. येत्या काळात प्रेक्षकांना त्यांच्या या प्रश्नाची उत्तरे मिळणार आहेत.
share
(5 / 5)

इतर गॅलरीज