(5 / 4)थिरकायला लावणारी गाणी गाता गाता उषा मंगेशकर यांच्या एका गाण्याने भक्तीसंगीतात एक वेगळा ट्रेण्ड आणला. तो चित्रपट होता १९७५ सालचा जय संतोषी माँ … आणि गाणं होतं, मै तो आरती उतारू रे… सुरांवरच्या प्रभुत्वाबरोबर उषा मंगेशकर यांनी चित्रकलेवरही प्रभुत्व गाजवलं. मराठी बरोबर हिंदी, गुजराती, बंगाली, नेपाळी ,मणिपुरी अशा भाषांमध्ये त्यांनी हजारो गाणी गायली. आज वयाच्या ८८व्या वर्षी उषा मंगेशकर यांनी गायलेली हजारो गाणी, रेखाटलेली अप्रतिम रेखाटनं आणि अद्वितीय कंपोझिशन्स हा खरंतर प्रत्येक भारतीयांसाठी अमूल्य ठेवा आहे.