Dhanashree Verma : युझवेंद्र चहलने २०२०मध्ये धनश्री वर्माशी लग्न केले होते. मात्र, लग्नाच्या जवळपास ५ वर्षानंतर आता त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या येत आहेत, ज्या ऐकून चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.
(1 / 7)
धनश्री वर्मा आणि युझवेंद्र चहल हे सोशल मीडियावर लोकप्रिय जोडपे होते. दोघांचे लग्न झाल्यावर त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र, आता त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या चर्चेत येत आहेत.(instagram)
(2 / 7)
घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान, प्रत्येकाला धनश्रीबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे. तुम्ही सोशल मीडियावर तिच्याबद्दल माहिती शोधत असाल, तर आम्ही तुम्हाला धनश्रीबद्दल काही गोष्टी सांगणार आहोत…(instagram)
(3 / 7)
धनश्री व्यवसायाने डेंटिस्ट आहे. याशिवाय तिला नृत्याचीही खूप आवड आहे. केवळ तिच्या डान्समुळे ती सोशल मीडियावर लोकप्रिय झाली आहे. इंस्टाग्रामवर तिचे ६.२ मिलियन फॉलोअर्स आहेत.(instagram)
(4 / 7)
युझवेंद्रही तिला डान्समुळेच भेटला. तो तिच्याकडून डान्स शिकायला गेला आणि नंतर दोघांची मैत्री झाली आणि त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.(instagram)
(5 / 7)
धनश्रीनेही अनेक गाणी केली असून, तिची लोकप्रियता खूप वाढत आहे. सोशल मीडियावर त्याच्या पोस्ट खूप व्हायरल होत असतात.(instagram)
(6 / 7)
धनश्री एकदा वादात आली होते, जेव्हा तिने तिच्या 'झलक दिखला जा' शोच्या कोरिओग्राफरसोबतचा क्लोज फोटो शेअर केला होता.(instagram)
(7 / 7)
या फोटोमुळे धनश्रीला सोशल मीडियावर खूप तिरस्कार सहन करावा लागला होता आणि तिने सोशल मीडियावर आपली निराशाही व्यक्त केली होती.(instagram)
(8 / 7)
याआधी २०२३ मध्येही दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्या चर्चेत आल्या होत्या. मात्र, त्यानंतर क्रिकेटरने सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिले होते. कृपया आमच्या नात्याबद्दल अफवा पसरवू नका, असे देखील म्हटले होते.(instagram)