Tv Serials: काही टीव्ही मालिकांना चांगला प्रतिसाद मिळतो तर काही सुपरफ्लॉप ठरतात. IMDb वर सर्वात कमी रेटिंग असलेल्या मालिकांविषयी चला जाणून घेऊया...
(1 / 7)
छोट्या पडद्यावरील मालिकांचा टीआरपी हा नेहमी पाहिला जातो. पण कधीकधी सर्वाधिक टीआरपी असलेल्या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतीलच असे नाही. अशा कोणत्या मालिका आहेत ज्याला IMDb वर सर्वात वाईट रेटिंग दिले आहे चला जाणून घेऊया...
(2 / 7)
बीआर चोप्रा यांची महाभारत ही मालिका सुपरहिट ठरली होती. पण जेव्हा एकता कपूरने 'कहानी हमारे महाभारत की' नावाने महाभारताचा रिमेक केला तेव्हा तो फ्लॉप ठरला. प्रेक्षकांनी तो टीव्हीवर पाहिला पण आयएमडीबीवर या शोला सर्वात कमी रेटिंग देण्यात आले होते. या शोला १० पैकी केवळ १ रेटिंग होते.
(3 / 7)
2011 मध्ये सुरू झालेली 'ससुराल सिमर का' ही टीव्ही मालिका प्रत्येक घराघरात पाहायला मिळाली. घरातील महिलांच्या पसंतीस उतरलेला हा शो टीआरपीच्या बाबतीत चांगली कामगिरी करत होता, परंतु या शोचे आयएमडीबी रेटिंग केवळ 1.1 होते
(4 / 7)
'क्यूंकी सास भी कभी बहू थी' ही मालिका एका सासू-सुनेच्या गोड-आंबट आयुष्याची कथा सांगणारी होती. या मालिकेत तीन सूना दाखवण्यात आल्या होत्या. ही मालिका सुपरहिट होती. पण मालिकेला केवळ १.२ रेटिंग होते.
(5 / 7)
कुंडली भाग्य
(6 / 7)
२००० साली सुरू झालेल्या 'कहानी घर घर की' या मालिकेलाही या यादीत स्थान मिळाले आहे. कारण या सुपरहिट टीव्ही शोला प्रत्येक घराघरात खूप प्रेम मिळाले, पण त्याचे IMDb रेटिंग फक्त 2.3 आहे.
(7 / 7)
ये रिश्ता क्या कहलाता है
(8 / 7)
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दीर्घकाळापासून प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारा टीव्ही शो 'अनुपमा' आयएमडीबी रेटिंगच्या बाबतीत मागे आहे. या शोला ३.८ रेटिंग देण्यात आले आहे.