काही दिवसांपूर्वी 'इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये दीपिका पादुकोणच्या मानसिक आरोग्यावर विनोद करण्यात आला होता. हा शो समय रैनाचा आहे आणि जेव्हा त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोलिंग सहन करावे लागले. तेव्हा त्याने माफी मागण्याऐवजी लोकांना जाऊन त्याच्या व्हिडिओंवर कमेंट करण्यास सांगितले जेणेकरुन, त्याची कमाई आणखी वाढू शकेल.
(instagram)एका एपिसोडमध्ये जेव्हा एका कॉमेडियनला समयला ट्रोल करायचे होते, तेव्हा समय म्हणाला होता की, जर तुला मला चॅलेंज करायचे असेल, तर बँक बॅलन्सने कर. यावरून प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण झाला होता, की तो नक्की किती कमाई करत असेल? सोशल मीडियावर त्याचं नेटवर्थ देखील सर्च केलं गेलं.
(instagram)नेट वर्थ स्पॉटच्या अहवालानुसार, समयची एकूण संपत्ती १६.५ दशलक्ष डॉलर्स म्हणजे १४० कोटी रुपये आहे. ही कमाई त्याच्या YouTube चॅनेलची आहे ज्यामध्ये महसूल, जाहिराती आणि सदस्यांचा समावेश आहे.
(instagram)याशिवाय, तो ब्रँडसोबत भागीदारी, कॉमेडी शो आणि इतर गोष्टी देखील करतो, ज्यामुळे त्याचे तिथून देखील उत्पन्न देखील होते.
(instagram)समयच्या शोबद्दल बोलायचे तर, त्याच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये बादशाह, सिद्धांत चतुर्वेदी, उर्फी जावेद यांसारखे अनेक सेलिब्रिटी देखील दिसले आहेत. या शोमध्ये त्याने धमाल तर केलीच, पण त्यांना ट्रोलही करण्यात आले.
(instagram)समय हा एक चांगला बुद्धिबळपटू देखील आहे आणि तो अनेक वेळा हा गेम खेळत असतो, ज्याचे व्हिडिओही तो शेअर करतो.
(instagram)'कॉमिक्सस्तान २' या शोमध्ये समय स्पर्धक म्हणून आला होता आणि या शोचा विजेताही ठरला होता.
(instagram)