योगासनांमुळे तुमचे हृदय निरोगी राहण्यास मदत होऊ शकते. चार विशिष्ट योगासने हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात. ही आसने कशी करायची ते पाहा.
(Pixahive)दंडासन: जमिनीवर बसून प्रथम पाय समोर ठेवा. या स्थितीत दोन्ही पायांचे घोटे शेजारी चिकटतील असे ठेवा. पाठीचा कणा सरळ असावा. शरीराच्या वरच्या भागाला आधार देण्यासाठी दोन्ही हात नितंबांच्या बाजूला जमिनीवर ठेवा.
(Pixahive)सुखासन: दंडासनामध्ये बसताना डावा पाय हळूहळू गुडघ्यातून वाकवा. नंतर उजवा पाय त्याच्या आत ठेवा. डावे आणि उजवे पाय एकमेकांना 'लॉक' केले जातील अशी मांडी मारा. श्वासोच्छवास सामान्य ठेवत आसन पूर्ण करा.
(Pixahive)नौकासन: नौकासनात संपूर्ण भार तुमच्या कंबर आणि नितंबांवर असतो. या आसनात आपले शरीर थोडे मागे झुकवा. पाय थोडे जमिनीवरून घेऊन हात समोर ठेवा.
(Pixahive)संतोलासन: शरीराच्या संतुलनास संतोलन म्हणतात. या आसनामुळे शरीराचे विविध स्नायू मजबूत होतात. परिणामी शरीराचे संतुलन बरोबर राहते. या आसनामध्ये पोटावर झोपा. शरीर वर उचलून दोन्ही हातांवर आपले वजन संतुलित करा. या स्थितीत एक हात वरच्या दिशेने वर करा आणि परत आणा. दुसऱ्या हाताने देखील असेच करा.
(Pixahive)