हिंदू धर्मात एकादशी तिथीला खूप महत्त्व मानले जाते. प्रत्येक महिन्यात दोन वेळा एकादशीचे व्रत केले जाते. एकादशीच्या प्रत्येक महिन्याचा वेगळा अर्थ असतो. अशा परिस्थितीत जुलैपासून येणाऱ्या एकादशीला योगिनी एकादशी म्हणतात. योगिनी एकादशी व्रत दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्ष तिथीला केले जाते.
यावेळी योगिनी एकादशी शुभ योगांमध्ये साजरी केली जाणार आहे. योगिनी एकादशीला पाताळविश्वात तसेच स्वर्गात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाहूया जुलै महिन्यातील पहिले एकादशी व्रत कधी साजरे केले जात आहे.
योगिनी एकादशी २०२४ तिथी:
हिंदू दिनदर्शिकेनुसार, ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी तिथी सोमवार, १ जुलै रोजी सकाळी १० वाजून २६ मिनिटांनी सुरू होईल. मंगळवार, २ जुलै रोजी सकाळी ८ वाजून ४४ मिनिटांनी एकादशी तिथी समाप्त होईल. उदया तिथीनुसार जुलै महिन्याची पहिली एकादशी २ जुलै रोजी साजरी केली जाईल.
योगिनी एकादशी शुभ योग
यावर्षी योगिनी एकादशीला शुभ योग तयार होणार आहे. या दिवशी त्रिपुष्कर योग आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होईल. सर्वार्थ सिद्धी योग २ जुलै रोजी पहाटे ५ वाजून २७ मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी, ३ जुलै रोजी पहाटे ४ वाजून ४० मिनिटांनी समाप्त होईल. त्रिपुष्कर योग २ जुलै रोजी सकाळी ८ वाजून ४२ मिनिटांपासून ३ जुलै रोजी पहाटे ४ वाजून ४० मिनिटांपर्यंत चालणार आहे. या शुभ योगाची पूजा केल्यास दुप्पट फायदा होतो.
योगिनी एकादशीव्रत पारणाची वेळ :
जर तुम्ही २ जुलै रोजी योगिनी एकादशीचे व्रत करत असाल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३ जुलै रोजी उपवास सोडावा. योगिनी एकादशीचे व्रत ३ जुलै रोजी सकाळी ५ वाजून २८ मिनिटांपासून ते ७ वाजून १० मिनिटांपर्यंत सोडता येईल.
आषाढी एकादशीचे महत्व :
पुराणानुसार, योगिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा आणि उपवास केल्यास मनुष्य मृत्यूनंतर स्वर्गात पोहोचतो. अशा व्यक्तीला वैकुंठ लोकात जाण्याचे भाग्य प्राप्त होते. या व्रताच्या परिणामी मनुष्य जीवन-मरणाच्या चक्रातून मुक्त होतो. स्वत: भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला योगिनी एकादशीचे महत्त्व सांगितले होते.