योगाभ्यासाने अनेक आजार दूर होण्यास मदत होते. तसेच योगासन अनेक आजारांना आपल्या जवळही येऊ देत नाही. हिवाळ्यात थंडीमुळे सतत हुडहुडी भरते, जास्त थंडी जाणवते का? या योगासनांचा दररोज सराव केल्यास शरीर उबदार राहण्यास मदत होईल.
कपालभाती - कपालभाती हा एक प्रकारचा प्राणायाम आहे. हे ब्रीदिंग एक्सरसाइज केल्याने श्वासोच्छवासाच्या मदतीने शरीरात उष्णता निर्माण होते. त्यामुळे शरीर उबदार राहते.
शिर्षासन - शिर्षासन करणे खूप कठीण आहे आणि ते सर्व योगासनांचा राजा आहे. हे केल्याने संपूर्ण शरीराला आराम मिळतो. हे आसन केल्याने मेंदूला रक्तपुरवठा होतो आणि शरीराला ऊब मिळते.
विरभद्रासन - वॉरियर पोझ केल्याने केवळ स्नायू मजबूत होत नाहीत तर शरीरही लवचिक बनते. हे आसन केल्याने मानसिक फोकस वाढतो आणि शरीर उबदार राहण्यास मदत होते
कुंभकासन - याला प्लँक पोझही म्हणतात. जे सतत बसून काम करतात त्यांच्यासाठी प्लँक पोज किंवा कुंभकासन हे सर्वोत्तम योगासन आहे. कुंभकासन केल्याने शरीरात उष्णता येते.