(5 / 5)'ये जवानी है दिवानी' हा एक रोमँटिक कॉमेडी-ड्रामा आहे, ज्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, कल्की कोचलिन आणि आदित्य रॉय कपूर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. अविस्मरणीय अभिनय, आकर्षक कथानक आणि 'बद्तमीज दिल', 'बलम पिचकारी', 'सुभानल्लाह', 'कबीरा', 'इलाही' आणि 'दिल्लीवाली गर्लफ्रेंड' या गाण्यांमुळे हा चित्रपट आजही चाहत्यांच्या आवडीचा आहे.