भारतीय गोलंदाजांनी या वर्षात जबरदस्त कामगिरी केली. त्यांनीच हे वर्ष गाजवले आहे. २०२३ या वर्षात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत भारताचे ३ गोलंदाज सर्वात वरच्या स्थानावर आहेत. यानंतर पाकिस्तानच्या शाहीन शाह आफ्रिदीचाही या वर्षातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये समावेश आहे.
कुलदीप यादवच्या नावावर सर्वाधिक विकेट - कुलदीप यादवने २०२३ मध्ये टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. कुलदीपने या वर्षात ३० एकदिवसीय सामन्यांमध्ये ४९ विकेट घेतल्या आहेत.
मोहम्मद सिराज दुसऱ्या क्रमांकावर - २०२३ मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत मोहम्मद सिराज दुसऱ्या स्थानावर आहे. सिराजने २५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४४ विकेट घेतल्या आहेत.
मोहम्मद शमीनेही दाखवला दम - भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने या वर्षात अवघ्या १९ सामन्यात ४३ बळी घेत खळबळ माजवली. यावर्षी तो सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा गोलंदाज आहे.
संदीप लामिछाने चौथ्या क्रमांकावर - नेपाळ क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू संदीप लामिछानेनेही यावर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये चमक दाखवली आहे. संदीपने २०२३ मध्ये २१ सामन्यात ४३ विकेट घेतल्या आहेत.