(3 / 7)जल्लीकट्टूला परवानगी : १८ मे रोजी, सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या विधानसभेने प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा (PCA) कायदा, १९६० मध्ये केलेल्या दुरुस्त्या कायम ठेवल्या. महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यत दक्षिण भारतातील जल्लीकट्टू, कंबाला या परंपरा प्राण्यांच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात असल्यामुळे बंद करण्याचे आदेश २०१४ साली सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर तमिळनाडू, कर्नाटकात नियम बदलण्यात आले. तर महाराष्ट्र सरकारने बैलगाडी शर्यतीला परंपरा म्हणून सिद्ध करण्यासाठी एक संशोधनात्मक अहवाल तयार केला. सर्वोच्च न्यायालयात पुन्हा नव्याने झालेल्या सुनावणीत १८ मे २०२३ रोजी बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवली.(PTI)