(1 / 4)टाटा पंच: टाटा मोटर्सची भारतातील सर्वात मोठी ईव्ही लाइन-अप आहे, या महिन्यात प्रत्येक मॉडेल आकर्षक सूट आणि फायद्यांसह उपलब्ध आहे. एमवाय २४ साठी टियागो ईव्ही आणि टिगोर ईव्ही १.१५ लाख रुपयांपर्यंत सूट आणि फायद्यांसह येतात, ज्यात काही व्हेरियंटसाठी एक्सचेंज बोनसदेखील समाविष्ट आहे. टाटा पंच ईव्हीमध्ये एमवाय २४ मॉडेलच्या लोअर व्हेरियंट २५ हजारांपर्यंत सूट मिळते. तर, टॉप व्हेरिएंटवर ७० हजारापर्यंत बचत करता येऊ शकते.