रांची येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल आणि ध्रुव जुरेल यांनी धमाकेदार कामगिरी केली. या कामगिरीमुळे त्यांनी कसोटी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. कसोटी फलंदाजांच्या यादीत हे तिन्ही स्टार कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थानावर आले. जसवालने पहिल्या डावात ७३ आणि दुसऱ्या डावात ३७ धावांची खेळी केल्याने जसवालने जागतिक क्रमवारीत तीन स्थानांची झेप घेतली. टॉप १० मध्ये स्थान मिळवण्यासाठी तो उत्सुक आहे. यशस्वी कसोटी फलंदाजांच्या यादीत १२ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
रांची कसोटीच्या पहिल्या डावात ३८ आणि दुसऱ्या डावात नाबाद ५२ धावांची खेळी करणाऱ्या शुभमन गिलने जागतिक क्रमवारीत चार स्थानांची झेप घेतली आहे. गिल कसोटी फलंदाजांच्या यादीत ३१ व्या क्रमांकावर आहे. ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कसोटी क्रमवारी आहे.
आयसीसी रँकिंगनुसार विराट कोहली अजूनही भारताचा सर्वोत्तम कसोटी फलंदाज आहे. वैयक्तिक क्रमवारीत तो नवव्या क्रमांकावर आहे. रांची कसोटीच्या दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावूनही रोहित शर्माकसोटी क्रमवारीत एका स्थानाची घसरण झाली आहे. तो १३ व्या क्रमांकावर आहे. रिषभ पंत १४ व्या क्रमांकावर आहे. रवींद्र जाडेजा कसोटी फलंदाजांच्या यादीत ३७ व्या क्रमांकावर आहे. पुजारा ३८ व्या क्रमांकावर आहे. रहाणे, श्रेयस आणि अक्षर पटेल अनुक्रमे ४९, ५२ आणि ५३ व्या क्रमांकावर आहेत.
रांचीयेथे आपले ३१ वे कसोटी शतक झळकावणाऱ्या जो रूटने कसोटी फलंदाजांच्या यादीत दोन स्थानांची सुधारणा केली. कसोटी फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आला. रूटच्या उदयात न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल (चौथ्या क्रमांकावर) आणि पाकिस्तानचा बाबर आझम (पाचव्या क्रमांकावर) यांना एक पाऊल मागे घ्यावे लागले.
केन विल्यमसनने नेहमीप्रमाणे जगातील नंबर वन कसोटी फलंदाजाचा मुकुट राखला. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने दुसऱ्या क्रमांकावर आपले स्थान कायम राखले आहे. ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा कसोटी फलंदाजांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने सातव्या आणि ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन आठव्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा हॅरी ब्रुक दहाव्या क्रमांकावर आहे.