ICC T20I Rankings: अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० मालिकेतील भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि अक्षर पटेलला यांनी चांगली काम केली, ज्याचा फायदा त्यांना आयसीसी टी-२० क्रमलवारीत झाला.
(1 / 4)
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये यशवीचे जागतिक रँकिंगमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. उल्लेखनीय म्हणजे, जागतिक क्रमवारीत यशवीचे हे आतापर्यंतचे कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान आहे. जैस्वालचे सध्या ७३९ रेटिंग गुण आहेत.
(2 / 4)
यशवीला कंबरेच्या दुखापतीमुळे मोहाली येथे अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यातून मुकावे लागले होते. इंदूर येथे झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात त्याने केवळ ३४ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६८ धावा केल्या.
(3 / 4)
यशस्वीने त्याच्या आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीत आतापर्यंत १६ सामन्यांच्या १५ डावांमध्ये फलंदाजी केली. त्याने ३५.५७ च्या सरासरीने ४९८ धावा केल्या, ज्यात एक शतक आणि ४ अर्धशतक झळकावली.
(4 / 4)
भारताचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव ८६९ रेटींग गुणांसह टी-२० क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. भारताचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड टी-२० क्रमवारीत ९व्या क्रमांकावर आहे.(REUTERS)
(5 / 4)
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये गोलंदाजांच्या यादीत अक्षर पटेलने १२ स्थानांची झेप घेऊन ५व्या क्रमांकावर पोहोचला आहे. गोलंदाजांच्या यादीत भारताचा रवी बिश्नोई चार स्थानांनी घसरून सहाव्या क्रमांकावर आहे.