कसोटीच्या तिसऱ्या दिवशी आणि भारताच्या दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने टीम इंडियासाठी १०४ धावा केल्या. जैस्वालने सलग दुसऱ्या कसोटीत शतक केले आहे. तर शुभमन ६५ धावा करून नाबाद आहे.
(AP)जैस्वाल आणि गिलच्या फलंदाजीमुळे भारतीय संघाला आतापर्यंत ३२२ धावांची आघाडी मिळाली आहे. तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांना रोहित शर्मा आणि रजत पाटीदारच्या रूपाने दोन बळी मिळाले. जैस्वाल पाठदुखीमुळे निवृत्त होऊन तंबूत परतला.
(ANI )तत्पूर्वी, मोहम्मद सिराजच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लंडचा पहिला डाव ३१९ धावांवर गुंडाळला. सिराजने टीम इंडियासाठी ४ विकेट घेतल्या.
(BCCI-X)सिराजशिवाय भारताकडून कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विन यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली आहे.
(BCCI-X)तत्पूर्वी, राजकोट कसोटी सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर रोहित शर्मा (१३१) आणि रविंद्र जडेजाच्या (११२) शतकांच्या बळावर भारताने पहिल्या डावात ४४५ धावा केल्या.
(AFP)