(6 / 7)Yamaha MT-07 बाइकमध्ये अनेक फिचर्सपैकी एक आकर्षक फिचर म्हणजे बाइकच्या हँडलवर मधोमध असलेला ५ इंच आकाराचा TFT इन्स्टुमेंट क्लस्टर. यात हलते स्क्रीन बसवण्यात आले असून MyRide या अॅपच्या माध्यमातून तुमचा स्मार्टफोन कनेक्ट करता येणार आहे. शिवाय प्रत्येकाच्या गरजेनुसार या स्क्रीनची थीम बदलून कधी स्ट्रीट तर कधी टुरिंग थीम करता येणार आहे. या मॉनिटर स्क्रीनवर तुम्हाला येणारे इनकमिंग कॉल, मॅसेजेस, नोटिफिकेशन्स हे सगळं पाहता येणार आहे.