Xiaomi SU7 electric car Pics: स्मार्टफोन निर्माता कंपनीची इलेक्ट्रिक कार लवकरच बाजारात दाखल होणार आहे. कंपनीच्या पहिल्या इलेक्ट्रिक कारचे नाव शाओमी एसयू७ आहे. ही कार थेट टेस्ला मॉडेल्सशी स्पर्धा करेल. ही कार एप्रिलमध्ये बीजिंग ऑटो शोमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. लॉन्चपूर्वी कंपनीने या कारच्या इंटीरियरचा अधिकृत फोटो शेअर अनेकांना आकर्षित केले आहे.
एसयू७ चा ड्युअल-टोन डॅशबोर्ड देखील खूप आकर्षित आहे. कारमध्ये क्लीन फिनिश केलेल्या सेंटर कन्सोलसह फिजिकल बटण पाहायला मिळतील. एसी, फॅन स्पीड आणि सस्पेन्शन सेटिंग्ज या बटणद्वारे व्यवस्थापित केल्या जाऊ शकतात. फिजिकल बटणांच्या पुढे एक कप होल्डर देखील आहे.
स्क्रीनच्या खाली 55-वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह वायरलेस चार्जिंग क्षेत्र आहे. SU7 चे स्टीयरिंग व्हील तळाशी आहे. यामुळे या कारचे इंटीरियर खूपच स्पोर्टी बनले आहे. मोठ्या पॅनोरामिक सनरूफ असलेल्या या सेडान कारमध्ये मागील प्रवाशांसाठी स्वतंत्र डिस्प्ले देखील देण्यात आली.
शाओमी एसयू७ ही चार दरवाजांची इलेक्ट्रिक सेडान आहे. त्याची लांबी ४९९७ मीमी, रुंदी १९६३ मिमी आणि उंची १४५५ मिमी आहे. या कारचा व्हीलबेस ३००० एमएम आहे. कारचे एंट्री लेव्हल मॉडेल ७३.६kWh बॅटरी पॅकसह येईल. कंपनी टॉप एंड व्हेरियंटमध्ये १०१ kWh बॅटरी पॅक ऑफर करणार आहे. ही कार कंपनीच्या सेल-टू-बॉडी टेक्नोलॉजीवर काम करते.