(1 / 6)WTC Points Table: केपटाऊन कसोटीत भारतासमोर विजयासाठी ७९ धावांचे लक्ष्य होते, हे लक्ष्य भारताने सहज गाठले. याआधी सेंच्युरियन कसोटीत भारताला एक डाव आणि ३२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. केपटाऊनमध्ये भारतीय संघाचा हा पहिलाच कसोटी विजय ठरला. याआधी केपटाऊनमध्ये झालेल्या ६ कसोटी सामन्यांमध्ये भारताला ४ वेळा पराभवाला सामोरे जावे लागले होते, तर २ सामने अनिर्णित राहिले होते. (pti)