
यानंतर आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना ७ मार्चपासून धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. रांची कसोटीच्या चौथ्या दिवशी भारत आणि इंग्लंड यांच्यात चुरशीची स्पर्धा झाली. शुभमन गिल (५२*) आणि ध्रुव जुरेल (३९*) यांच्यातील ७२ धावांच्या भागीदारीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
भारत दुसऱ्या स्थानावर कायम - भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) २०२३-२५ सायकलमध्ये आपला ८ वा सामना खेळला आणि पाचव्या विजयाची नोंद केली. इंग्लंडविरुद्धची मालिका जिंकूनही भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. भारताचे ६२ गुण असून त्याची टक्केवारी ६४.५८ आहे.
इंग्लंडची अवस्था वाईट - त्याचबरोबर बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंडला या पराभवाचा मोठा फटका बसला आहे. इंग्लंडचा संघ WTC गुणतालिकेत आठव्या स्थानावर घसरला आहे. इंग्लंडचा ९ सामन्यांमधला हा पाचवा पराभव आहे. त्यांचे गुण २१ आहेत तर त्यांची टक्केवारी २१.८७ आहे. या WTC सायकलमध्ये इंग्लंडला टॉप-२ मध्ये पोहोचणे कठीण झाले आहे.
न्यूझीलंड अव्वल स्थानावर - डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलवर न्यूझीलंडचे वर्चस्व कायम आहे. किवी संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत, त्यापैकी ३ जिंकले आहेत. न्यूझीलंडचे ३६ गुण आणि टक्केवारी ७५ आहेत.


