मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  भारताने कसोटी मालिका जिंकली, पण WTC गुणतालिकेत नंबर वन कोण? पाहा

भारताने कसोटी मालिका जिंकली, पण WTC गुणतालिकेत नंबर वन कोण? पाहा

Mar 09, 2024 05:38 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • ICC World Test Championship Standings: टीम इंडियाने शनिवारी (९ मार्च) धरमशाला कसोटीत इंग्लंडचा एक डाव आणि ६४ धावांनी पराभव केला. यासह भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले आहे.

टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ मध्ये आतापर्यंत ९ कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी ६ जिंकले आणि दोन गमावले आहेत. तर एक कसोटी सामना अनिर्णित राहिला. भारताचे एकूण ७४ गुण आहेत आणि ६८.५१ टक्के आहेत.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

इंग्लंडची अवस्था वाईट- मालिका गमावल्यानंतर इंग्लंडची अवस्था आता वाईट झाली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत आठव्या स्थानावर घसरला आहे. इंग्लंडने १० पैकी फक्त तीन सामने जिंकले तर ६ गमावले. एक सामना अनिर्णित राहिला. इंग्लंडचे केवळ २१ गुण आणि १७.५ टक्के आहेत. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

श्रीलंकेचा संघ शेवटच्या स्थानावर आहे. त्यांनी दोन सामने खेळले आहेत आणि दोन्ही गमावले आहेत. श्रीलंकेचे शुन्य गुण आहेत.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये चुरस-   वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकासाठी सध्या न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चुरशीची स्पर्धा आहे. न्यूझीलंडचा संघ सध्या  गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडने आतापर्यंत ५ कसोटी सामने खेळले असून ३ जिंकले आहेत तर दोन गमावल्या आहेत. किवी संघाचे ३६ गुण असून त्यांची टक्केवारी ६० टक्के आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

त्याच वेळी, ऑस्ट्रेलियन संघ ११ सामन्यांत ७ विजय, ३ पराभव आणि एक अनिर्णितसह तिसऱ्या स्थानावर आहे. कांगारू संघाचे ७६ गुण असून त्यांची टक्केवारी ५९.०९ आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी क्राइस्टचर्चमध्ये सुरू आहे. यामध्ये कोणता संघ विजेता ठरेल, त्यांचे दुसरे स्थान निश्चित आहे. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

त्याच वेळी, ऑस्ट्रेलियन संघ ११ सामन्यांत ७ विजय, ३ पराभव आणि एक अनिर्णितसह तिसऱ्या स्थानावर आहे. कांगारू संघाचे ७६ गुण असून त्यांची टक्केवारी ५९.०९ आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी क्राइस्टचर्चमध्ये सुरू आहे. यामध्ये कोणता संघ विजेता ठरेल, त्यांचे दुसरे स्थान निश्चित आहे. 

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज