WPL Points Table 2024 : महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL 2024) सोमवारी (२६ फेब्रुवारी) दिल्ली कॅपिटल्सने युपी वॉरियर्सचा पराभव केला. दिल्लीच्या विजयामुळे WPL च्या गुणतालिकेत बदल झाला आहे.
(1 / 5)
महिला प्रीमियर लीग (WPL 2024) मध्ये सोमवारी (२६ फेब्रुवारी) दिल्ली कॅपिटल्सने आणि युपी वॉरियर्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात दिल्लीने यूपी वॉरियर्सचा ९ विकेट्सनी पराभव केला. दिल्लीच्या या विजयानंतर गुणतालिकेत बदल झाला आहे.
(2 / 5)
यूपीविरुद्धच्या विजयासह दिल्लीचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. दिल्ली कॅपिटल्सचे दोन सामन्यांत २ गुण झाले आहेत. या मोठ्या विजयामुळे, दिल्लीचा नेट रनरेट +१.२२२ पर्यंत वाढला आहे. (PTI)
(3 / 5)
यूपी वॉरियर्सचे गुणांचे खाते अद्याप उघडलेले नाही. युपीला आतापर्यंत दोनपैकी दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.(PTI)
(4 / 5)
मुंबई इंडियन्स गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्यांचे दोन सामन्यात दोन विजयांसह ४ गुण आहेत. मुंबईचा नेट रन रेट +०.४८८ आहे. (AFP)
(5 / 5)
आरसीबी दोन गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. आरसीबीने एक सामन्यात एक विजय मिळवला आहे.(AFP)
(6 / 5)
गुजरात जायंट्स संघ चौथ्या स्थानावर आहे. त्यांचे गुणांचे खाते अद्याप उघडलेले नाही. गुजराने आतापर्यंत एक सामना खेळला असून त्यात त्यांचा पराभव झाला. आज (२७ फेब्रुवारी) मंगळवारी गुजरातचा सामना आरसीबीशी होणार आहे.(WPL)