World Tourism Day: महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून ओळखले जाते गगनबावडा, कोल्हापुरातील या हिल स्टेशनला कधी व कसे जाल?
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  World Tourism Day: महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून ओळखले जाते गगनबावडा, कोल्हापुरातील या हिल स्टेशनला कधी व कसे जाल?

World Tourism Day: महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून ओळखले जाते गगनबावडा, कोल्हापुरातील या हिल स्टेशनला कधी व कसे जाल?

World Tourism Day: महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून ओळखले जाते गगनबावडा, कोल्हापुरातील या हिल स्टेशनला कधी व कसे जाल?

Published Sep 27, 2024 10:31 AM IST
  • twitter
  • twitter
tourist places in kolhapur: आपण आपल्या रांगड्या शाहूनगरी कोल्हापुरात वसलेल्या गगनबावडा या नयनरम्य हिल स्टेशनबाबत जाणून घेणार आहोत.
आज २७ डिसेंबर रोजी 'जागतिक पर्यटन दिन' साजरा केला जात आहे. यानिमित्ताने आपण आपल्या रांगड्या शाहूनगरी कोल्हापुरात वसलेल्या गगनबावडा या नयनरम्य हिल स्टेशनबाबत जाणून घेणार आहोत. शिवाय तुम्हाला याठिकाणी कसे पोहोचायचे आणि कोणता काळ उत्तम असतो हेसुद्धा सांगणार आहोत. 
twitterfacebook
share
(1 / 9)

(instagram)
गगनबावडा अगदी शांत निसर्गदृश्ये आणि हिरव्यागार पर्वत रांगा आणि जंगलांनी वेढलेला आहे. येथे तुम्ही सहयाद्रीच्या कुशीत आनंदाचे क्षण घालवू शकता. शिवाय निसर्गाचा भरपूर आनंद घेऊ शकता. 
twitterfacebook
share
(2 / 9)

करूळ घाट आणि भुईबावडा हे दोन घाट गगनबावड्यातून उगम पावणारे आणि दख्खनच्या पठाराला महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या प्रदेशात, कोकणाशी जोडणारे सर्वात निसर्गरम्य मार्ग आहेत. करूळ घाट वैभववाडीकडे उतरतो आणि त्याची लांबी १९ किमी आहे.
twitterfacebook
share
(3 / 9)

गगनबावडा रोडला असलेले पळसंबे हे या अनोख्या गुहा मंदिरे आणि रचनांमुळेही प्रसिद्ध आहे. या अखंड वास्तू पांडवांनी त्यांच्या वनवासात बांधल्या होत्या आणि त्यांना पांडवलेणी असेही म्हणतात.
twitterfacebook
share
(4 / 9)

मोरजाई पठार हे अगदी उंचावरील पठार आहे. हे एक अद्वितीय पठार आहे ज्यात मोरजाई देवीचे गुहा मंदिरदेखील आहे. येथे डोळ्यांना सुखावणारी  जैवविविधता आहे. ट्रेकिंगसाठी हे एक उत्कृष्ट ठिकाण आहे, तिथून दिसणारे दृश्य हे आश्चर्यकारक आहे. 
twitterfacebook
share
(5 / 9)

 पंत अमात्य बावडेकर कुटुंबाचे पूर्वीचे निवासस्थान येथे आहे. याठिकाणी वाड्यात एक छोटा वारसा संग्रहालय आणि पंत अमात्य घराण्याच्या प्राचीन वस्तू आहेत. या वाड्यात अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले असून त्यात “पच्छडलेला” हा चित्रपट सर्वाधिक प्रसिद्ध आहे. हे सकाळी 10.30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत पर्यटकांसाठी खुले असते.  
twitterfacebook
share
(6 / 9)

गनगनबावड्यात पर्यटनासाठी कोणता काळ उत्तम- गनगनबावड्यात पर्यटनासाठी ऑक्टोबर ते मार्च आणि  जून ते सप्टेंबर हा काळ सर्वात उत्तम आहे. तुम्हालाही यंदा ऑक्टोबरमध्ये ट्रिप प्लॅन करता येईल. 
twitterfacebook
share
(7 / 9)

गगनबावड्यात कसे पोहचाल-   कोल्हापूरमधून ५५ किलोमीटर अंतरावर हे हिल स्टेशन वसलेले आहे. याठिकाणी पोहोचण्यासाठी एस. टी. बसेसची भरपूर सुविधा आहे. इथे पोहोचण्यासाठी एक तास लागतो. शिवाय तुम्ही खाजगी वाहनानेही पोहचु शकता. तुम्हाला करूळ व भुईबावडा हे दोन घाट लागतात. हे घाट कोकणात मार्गक्रमण करतात. या घाटाचे निसर्गरम्यसौंदर्य तर पावसाळ्यात भुरळ घातल्याशिवाय राहत नाहीत. 
twitterfacebook
share
(8 / 9)

याठिकाणी राहण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची सुविधा उपलब्ध आहे. शिवाय अनेक हॉटेल्सदेखील उपलब्ध आहेत. याठिकाणी जेवण, नाष्ट्याची सुविधा आहे. तसेच घरातून खाद्यपदार्थ, जेवण घेऊनदेखील जाता येते. 
twitterfacebook
share
(9 / 9)

इतर गॅलरीज