साप हा शब्द ऐकून अनेकांना भीती वाटते. हा प्राणी बघून किती विचित्र सृष्टी आहे, असा विचारही अनेकांना येतो. सापांनाही एक दिवस असतो हे अनेकांना माहित नसते.
दरवर्षी १६ जुलै हा जागतिक सर्प दिन म्हणून साजरा केला जातो. सापांच्या विविध प्रजातींविषयी जनजागृती करण्यासाठी जागतिक सर्प दिन साजरा केला जातो.
साप हा शब्द जुन्या 'स्नागा'पासून आला आहे. या सापाची उत्पत्ती सुमारे १७.४ कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या सरड्यांपासून झाली असावी असे मानले जाते.
मानवाची उत्क्रांती होण्यापूर्वी पृथ्वीवर साप अस्तित्वात होते, असे मानले जाते. १९६७ मध्ये अमेरिकेत स्नेक फार्म तर्फे पहिल्यांदा जागतिक सर्प दिन साजरा करण्यात आला.
अन्नसाखळीत साप महत्त्वाचे असून पर्यावरणाचा समतोल राखणे, किडींचे नियंत्रण करणे आणि शेतातील उंदीरांचे नियंत्रण करण्यात साप महत्त्वाची भूमिका बजावतात.
जगभरात सापांच्या साडे तीन हजारांहून अधिक प्रजाती असून त्यापैकी केवळ ६०० प्रजाती विषारी आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार सापांच्या केवळ २०० प्रजाती मानवी जीवाला गंभीर धोका निर्माण करतात.
साप औषधांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावतात. सापांचे संरक्षण करण्याची गरज आहे. गेल्या ३० वर्षांत जगातील सापांची संख्या १० टक्क्यांनी कमी झाली आहे. सापांच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.