मराठी बातम्या  /  Photo Gallery  /  World No Tobacoo Day: This Helpline Will Help You To Quit The Tobacco Addiction

World No Tobacoo Day: तंबाखूचं व्यसन सोडवायचंय? या हेल्पलाइनवर करा फोन

May 31, 2023 01:17 PM IST Hiral Shriram Gawande
May 31, 2023 01:17 PM , IST

  • Helpline To Quit Tobacco Addiction: दरवर्षी ३१ मे रोजी तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचे जर तंबाखूचे व्यसन सोडवायचे असेल तर तुम्ही या हेल्पलाइन नंबरची मदत घेऊ शकता.

तंबाखूचे सेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकते. तंबाखू किंवा धूम्रपानामुळे व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर तसेच शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.

(1 / 6)

तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने १९८७ मध्ये तंबाखू निषेध दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. १९८८ मध्ये मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी तो साजरा करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन  साजरा केला जातो.

(2 / 6)

ज्यांना धूम्रपान सोडण्याची इच्छा आहे परंतु ते कसे करावे हे माहित नाही त्यांच्यासाठी सरकारने मदतीचा हात दिलेला आहे. 

(3 / 6)

भारत सरकारने राष्ट्रीय स्तरावरील तंबाखू बंद क्विटलाइनची स्थापना केली आहे. वल्लभभाई पटेल चेस्ट इन्स्टिट्यूट (VPCI), नवी दिल्ली येथे टोल फ्री क्रमांक 1800-112-356 सह ही स्थापना करण्यात आली. 

(4 / 6)

या सेवांचा २०१८ पासून प्रादेशिक उपग्रह केंद्रांपर्यंत विस्तार करण्यात आला आणि समुपदेशन प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करण्यात आले. 

(5 / 6)

हे प्रादेशिक उपग्रह क्रेंद्र गुवाहाटी येथील भुवनेश्वर बोरूआ कॅन्सर इन्स्टिट्यूट (BBCI), बंगलोर येथील  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस (NIMHANS), आणि मुंबई येथील टाटा मेमोरियल सेंटर (TMC) येथे आहेत. 

(6 / 6)

WhatsApp channel

इतर गॅलरीज