संगीतामुळे उत्साही मूड तयार होतो. मूड खराब असेल किंवा लो वाटत असेल तर तुमचे आवडते गाणे ऐका. संगीतामुळे आपला मूड बूस्ट होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्हाला बरं वाटतं.
जेव्हा आपल्याला थकवा जाणवतो तेव्हा संगीत ऐकल्याने फ्रेश वाटते. संगीत आपल्याला भावनिकरित्या दुखावणाऱ्या गोष्टींपासून विचलित करण्यास देखील मदत करते.
संगीत ऐकणे रक्तदाब कमी करण्यास, कोर्टिसोलची पातळी कमी करण्यास आणि हृदय गती नियंत्रित करण्यास मदत करते. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
अल्झायमर किंवा स्मृतिभ्रंशावर कोणताही इलाज नसला तरी, म्युझिक थेरपी आठवणींना उत्तेजन देण्यासाठी आणि या परिस्थितीची काही लक्षणे दूर करण्यात महत्त्वपूर्ण प्रगती दर्शविते.
व्यायामादरम्यान आवडती गाणी वाजविणे उत्साह वाढवण्यास आणि शारीरिक कार्यक्षमता वाढविण्यात मदत करू शकते.